Jilebee arts Inc and Indian Heritage and Cultural Association-NJ
proudly present a multi-lingual short play festival, "Natya Darpan -Boston" for theater connoisseurs in and around Boston. All plays will be presented with English super-titles.
प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते. गेल्या २ दशकांपासून जवळ जवळ ८० व्यावसायिक मराठी नाटकांचे दिग्दर्शन ( तीन पायांची शर्यत, A Perfect Murder, ढोल ताशे, Family Drama, महारथी, हा शेखर खोसला कोण आहे?? ) आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत. विविध मराठी आणि हिंदी सिनेमा, मराठी मालिकांमधून अभिनेता म्हणून केलेले काम आणि असंख्य पुरस्कारांनी गौरवलेले चतुरस्त्र कलाकार!
Abstract
"छूनेसे प्यार बढता हैं"
एक मस्त कलंदर आणि एक पारंपारिक साधी सरळ मुलगी "Blind Date" वर भेटतात त्याची ‘ही’ कथा. त्यांचे भिन्न स्वभाव आणि गतायुष्यात आलेली वादळे असं असूनही त्यांना एकमेकांना सांधणारा एक धागा सापडतो. पण पुन्हा दुसऱ्यांदा भेटायला एवढं पुरेसं असेल?
लेखिका: अमृता हर्डीकर
दिग्दर्शक: महेश गाडगीळ
कलाकार: सुवर्णा घैसास व निरंजन पोतनीस
झुनी
घरा समोर अचानक जखमी अवस्थेत सापडणारा आणि मदत मागणारा परवेझ. नाईलाजाने पण माणुसकीच्या नात्याने मदत करणारी झुनी, हळू हळू दोघांच्या संभाषणातून एक वेगळाच विषय उलगडत जात असताना शेवटी निराळंच वळण घेणारी ही काश्मीर आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेली रंजक कथा.
लेखक व दिग्दर्शक: सुधन्वा आगवेकर
कलाकार: महेश गाडगीळ, शिल्पा कुळकर्णी
मादी
मन की बुद्धी, परिस्थिती की प्रेम? या द्वंद्वात अडकलेल्या स्त्रीची कथा. इच्छा, अपेक्षा, सुख, त्याग आणि अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'तिची' ही कहाणी. त्यातून तिची सुटका होईल का? काय असेल तिचा निर्णय?
लेखक: विजय तेंडुलकर
दिग्दर्शिका: शिल्पा कुळकर्णी
कलाकार: स्वाती साने व हरीश पाटील
Sunday, June 07th@ 11:30 AM EDT (Boston Time)
About भूषण देसाई
व्यावसायिक आणि प्रायोगिक मराठी नाटकांची प्रकाश योजना (light design, lights operation and set design), या क्षेत्रात गेले अनेक वर्षे कार्यरत. झी गौरव, मिक्टा या नामांकित पुरस्कारांचे मानकरी. त्यांची काही गाजलेली नाटकं – Mr & Mrs,बी-पी,हमीदा बाई ची कोठी,जागो मोहन प्यारे,Girgaon Via Dadar,All The Best – 2,छू मंतर !, तीन पायांची शर्यत,अनन्या.
Registration fee 10$
वीर सावरकर जयंती निमित्त सावरकरांनी लिहिलेली नाटके, नाट्यसंगीत आणि कविता यावर आधारित एक कार्यक्रम.
शनिवार ३० मे रोजी
३ ते ५ या वेळात (Boston Time) विनामूल्य Digital Event
Abstract
Satish Vasant Alekar is a Marathi playwright, actor, and theatre director. A founder member of the Theatre Academy of Pune, and most known for his plays Mahanirvan (1974), Mahapoor (1975), Atirekee (1990), Pidhijat (2003), Mickey ani Memsahib (1973), and Begum Barve (1979), all of which he also directed for the Academy. Today, along with Mahesh Elkunchwar and Vijay Tendulkar he is one of the most influential and progressive playwrights not just in modern Marathi theater, but also larger modern Indian theater.
पन्नाशीतील एका मध्यमवर्गीय जोडप्याच्या रोजच्या जीवनातील एक प्रसंग. जागेपणी स्वप्न रंगविताना त्यांच्यात झालेल्या खुसखुशीत आणि चटकदार गप्पा. नवरा-बायको मधील प्रेमळ संवाद इतका मनोरंजक होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे योगेश सोमण यांनी लिहिलेली "गप्पा" ही एकांकिका.
वाळवंटात झालेला विमानाचा अपघात. जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर असताना, माणसांच्या स्वभावाचे भिन्न पैलू दाखवणारे नाट्य. विजय मोंडकर यांची "त्याचा पराक्रम - एक अपूर्णांक" ही एकांकिका याच प्रसंगाला नाट्य रुप देते.
आटपाट नगर होतं. एक राजा अन् दोन राण्या. एक आवडती आणि एक नावडती. परंपरागत कहाण्यांचा आधार घेत कालातीत संदेश देणारी आणि अंतर्मुख करणारी गोष्ट. विवेक गरुडांच्या लेखणीतून उतरलेले सामाजिक भाष्य करणारे नाटक "बदलतात गोष्टी काळानुसार".
Copyright © 2019-2024 jilebee arts - All Rights Reserved.
18 Thomas Newton Drive, Westborough, Massachusetts 01581, United States